खा. जलील यांनी घेतली मराठीतून शपथ; अनेकांच्या भुवया उंचावल्या

Foto
 औरंगाबाद: लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज सर्व नवनिर्वाचित खासदारंनी आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली.औरंगाबादचे नवनिर्वाचित खा. इम्तियाज जलील यांनीदेखील आज संसदेत आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली. वंचित बहुजन आघाडीचे एकमेव खा. असलेले जलील हे एमआयएम पक्षाचे आहेत. त्यामुळे ते कुठल्या भाषेत शपथ घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ते उर्दू किंवा हिंदीतून शपथ घेतील असे कयास लावले जात होते. मात्र, मराठीतून शपथ घेत उपस्थित सर्वानाच त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला. 

मी महाराष्ट्रीयन आहे. मराठी ही माझी मातृभाषा आहे त्यामुळे मी मराठीत शपथ घेतली असं जलील यांनी शाथविधिनानंतर सांगितले. 

खा. जलील यांनी मराठीत शपथ घेतल्याने उपस्थित खासदारंमध्येही उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाला. त्यांच्या शपथविधिनानंतर सभागृहातील खासदारांनी भारत माता कि जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.